औरंगाबाद: जिल्ह्याचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे हे गेल्या 20 वर्षांपासून चारवेळा लोकसभेवर निवडून गेले. यावेळी पाचव्यांदा लोकसभेत जाण्यासाठी निवडणूक लढवीत आहेत. निवडणूक प्रचार काळात गेल्या वीस वर्षात काय केले याचा हिशोब जनता मागत आहे. प्रत्येक वेळा प्रचारकाळात दोन-तीन वेळा प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधण्यासाठी पत्रकार परिषद घेणारे खा. चंद्रकांत खैरे यांनी यावेळी मात्र प्रसिद्धी माध्यमांना टाळल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद जिल्हा हा अजिंठा, वेरुळ, दौलताबादचा किल्ला, पानचक्की, मकबरा या पर्यटन स्थळामुळे तसेच औद्योगिकीकरणामुळे जागाच्या नकाशावर आहे. परंतु या जिल्ह्याचा ज्या प्रमाणात विकास व्हायला हवा त्याप्रमाणात विकास झालेला नाही. याचा जाब विचारला जाईल. यामुळे या निवडणूक प्रचारकाळात खा. खैरे यांनी त्यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात दोन वेळा झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणे टाळले. खा. खैरे प्रसिद्धी माध्यमांना का टाळत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.