मोदी आणि प्रज्ञासिंग यांच्यात नाते काय? प्रज्ञासिह यांच्या उमेदवरीवरून खा.ओवैसीचे आक्षेपार्ह विधान

Foto

औरंगाबाद: साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारी वरून एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी रात्री किराडपुरा येथे प्रचारसभेत  प्रज्ञासिंह आणि मोदी यांच्यात काय नात आहे असे विधान केल्याने  नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहे.

 वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे लोकसभेचे उमेदवार आहेत. जलील यांच्या प्रचारासाठी  ओवैसी शहरात तळ ठोकून आहेत. ते शहरातील गल्लीबोळ फिरून जलील यांच्यासाठी मते  मागत आहेत. याच दरम्यान दोन दिवसांपूर्वी शाहनुरवाडी येथे ओवैसिनी बुद्ध विहारात जाणे टाळल्याने चर्चेला उधाण आले होते.

गुरुवारी रात्री किराडपुरा भागात एमआयएम ची प्रचार सभा होती.यासभेला संबोधित  करताना ओवैसी यांनी मोदीं, भाजपा, काँग्रेसवर हल्ला चढविला. दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारी वरून अनेक मुद्दे उपस्थित केले. ज्ञाप्रसिंगला उमेदवारी कशी दिली, तिच्यावर असलेले आरोप गंभीर नाहीत का? दुसऱ्या एखाद्यावर दहशतवाद चा गुन्हा असताना त्यांना भाजपाने निवडणूक लढून दिली असती का? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत मोदी को प्रज्ञासिंग क्यो पसंद आगई, क्या बात है प्रज्ञासिंह मे, दोनो मे क्या नाता है, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. ओवेसीच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

वंदे मातरम बोलणार नाही.
एमआयएम कडून नेहमीच वंदे मातरम बोलण्यास नकार दिला जातो याचाच पुनरुच्चार कालच्या एमआयएमच्या सभेत आमदार वारीस पठाण यांनी केले. मी संविधानाला मानतो संविधानात कुठेही  वंदे मातरम बोलण्याची सक्ती नाही असे देखील ते म्हणाले. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker