जिल्हा परिषद तर्फे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस पुरस्कार वितरण
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : महिला म्हणून प्रत्येक महिलेला संघर्ष करावा लागतो, पुढची पिढी आपल्या पेक्षा ऍडव्हान्स आहे. आपण ठरवले तर ३६५ दिवस महिलांसाठीचे आहे. विकसित देशाच्या बरोबर जाण्यासाठी आपण मेहनत घेत आहे. फ्रंट लाईन वर्कर म्हणून आपणआघाडीवर आहात, तुमचे काम अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व पुरस्कारास पात्र असून ज्यांना यावेळी भेटला नाही त्यांनी पुढील वर्षी पुरस्कार भेटावा यासाठी चांगले काम करावे. सरपंच परिषदेत महिला सरपंच कामात अग्रेसर असल्याचे आढळून आले. जिल्हा परिषद मध्ये महिलांचे काम अत्यंत उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले.जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागातर्फे महिला दिनानिमित्त २०२३ चा आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस पुरस्कार वितरण सोहळा तापडिया नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील, मुख्य लेख व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे, महिला बालविकास विभाग छत्रपती संभाजीनगर विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. रेखा भंडारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण प्रसाद मिरकले, साधना बांगर सर्व विभागप्रमुख, गट विकास अधिकारी, अधिकारी , कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रसाद मिरकले यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करून पुरस्कार प्राप्तच्या कामाबद्दल माहिती दिली. संगीता पाटील यांनी महिलांच्या बाबत माहिती दिले, चंद्रकांत पाटील यांनी महिलांच्या अधिकाराची माहिती दिली, यासोबतच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ४२ सेविका, ४२ मदतनीस, १४ पर्यवेक्षिकाना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी रेड्डी, संजय महाळनकर, दीपक मैत्रे, प्रविन सर्जे, विजेता क्षीरसागर, अपर्णा कुलकर्णी आदींसह महिला बालविकास विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
यावेळी प्रसाद मिरकले यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करून पुरस्कार प्राप्तच्या कामाबद्दल माहिती दिली. संगीता पाटील यांनी महिलांच्या बाबत माहिती दिले, चंद्रकांत पाटील यांनी महिलांच्या अधिकाराची माहिती दिली, यासोबतच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ४२ सेविका, ४२ मदतनीस, १४ पर्यवेक्षिकाना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी रेड्डी, संजय महाळनकर, दीपक मैत्रे, प्रविन सर्जे, विजेता क्षीरसागर, अपर्णा कुलकर्णी आदींसह महिला बालविकास विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.