अंबड- स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खुनाचे
आरोप करणाऱ्या निलेश राणे विरोधात प्रतिबंधात्मक कारवाही करावी म्हणून अंबड येथील
युवासेनेचे कार्यकर्ते काल ( गुरुवार ) आक्रमक झाले होते. माजी आमदार शिवाजी चोथे
यांचे पुत्र विनायक चोथे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी निलेश राणेंचा
प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.
निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुख स्व.
बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आनंद दिघे यांचा खून केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे
सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. निलेश राणेंच्या या बेताल वक्त्याच्या
निषेधार्थ काल ( गुरुवारी ) अंबड तालुक्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश
राणेंचा प्रतीकात्मक पुतळा जाळला असून निलेश राणे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई
करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे विनायक शिवजी चोथे यांनी यावेळी पोलिसांना
निवेदन देऊन केली.