शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते, फक्त ५ मिनिटच दिला वेळ

Foto

बदनापूर- बुधवारी दि. ९ बीड जिल्हा दौऱ्यावर असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीड येथून औरंगाबाद कडे येत असताना वाटेत बदनापूर येथे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी संवाद व पशु खाद्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला मात्र शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेले ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मोजून ५ मिनिटांचाच वेळ दिला असल्याने त्यांनी या वेळेत किती शेतकऱ्यांशी नेमका काय संवाद साधला असेल ? असा प्रश्न निर्माण होतो.

 

बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपला बीड दौरा आटोपून बदनापूर येथे शेतकरी संवाद या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. उद्धव ठाकरेंचा हा दौराच मुळात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केला गेला होता. मात्र बदनापूर मध्ये झालेल्या कार्यक्रमास उद्धव यांनी धावती भेट दिली कुठल्या शेतकऱ्याशी संवाद केला. किंवा त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. ते आले दोन ते चार मिनिट भाषण दिले, या भाषणात शेतकऱ्यांशी संवाद करतील असे वाटले होते. मात्र प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट होत आहे. विम्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये सरकारने शेतकऱ्यांकडून गोळा केले आहेत असा आरोप केला आणि त्यांनी आपले भाषण संपवले. त्यामुळे शेतकरी संवाद यात्रेत शेतकऱ्यांचा उद्धव ठाकरेंशी संवाद होऊच शकला नाही.  

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker